सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र आहाकार माजविल्या नंतर शाळा-कॉलेज सर्वच बंद करण्यात आली. आठ महिने उलटून गेले तरी सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. या कालावधीमध्ये विद्यार्थी शाळेत न जाऊ शकल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी घरच्या घरीच गोष्टी वाचून ज्ञानात भर पडावी आपण वाचलेल्या गोष्टी इतरांना सांगता याव्यात, वाचनात अधिक प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून रा.जि.प आदर्श शाळा येरळ येथील आदिवासी विद्यार्थ्यांना लेखिका वर्षा सहस्रबुद्धे, अनुवाद मंजुळा वाघमारे मूलगामी प्रकाशनाची मासे नि खेकडे, कोल्ह्याने धरले, चमारीचे कोकरू, मोहाची फुले, चारोळी, टोपली, तगरितले मिठ, पळसाची पाने, दसरा, कापणी आदी विषयावर आधारित प्रत्येकी दहा पुस्तकांचा संच शाळेचे मुख्याध्यापक श्री खेमसिंग चव्हाण तसेच शिक्षिका सविता चव्हाण आणि हर्षा काळे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आली.
प्रत्येक पुस्तकातील छायाचित्रे माधुरी पुरंदरे यांनी अभ्यासपूर्वक आणि कल्पकतेने रेखाटलेली आहेत. पुस्तक जपून वापरा, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचून ती आत्मसात करा. इतरांना सांगा आपल्या ज्ञानात अधिक भर टाकून बुद्धी तल्लख करा असे शाळेचे मुख्याध्यापक श्री खेमसिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.







Be First to Comment