सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔷🔶
कोरोना काळात सॅनिटायजर जीवनावश्यक बनले असताना नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाने नागरिकांची अंतर्गत शरिरशुद्धी हाती घेतली कि काय अशी शंका सध्या होत असलेला पाणी पुरवठा पाहून येत आहे.पाताळगंगा नदितील दूषित पाणी थेट खालापूरकरांच्या घरात पुरविण्यात येत असून ब्लिचिंग पावङरचा अतिरिक्त मारा यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खालापूर शहरासाठी सहा किलोमीटर अंतरावरिल कलोते येथील मोकाशी धरणातील पाण्यावर पिण्याचे पाणी योजना राबवली आहे.परंतु या मार्गावरिल हाॅटेल, ढाबे याना देखील याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत असल्याने अतिरिक्त ताण येवून पाणी पुरवठा यंञणेत वारंवार बिघाङ होतो.
पर्यायी जलपुरवठा व्यवस्था म्हणून पाताळगंगा नदिवर सावरोली पूलानजीक नवीन योजना कार्यान्वित आहे.कलोते येथील पाणीपुरवठा यंञणेत दोन दिवसापासून बिघाङ झाल्याने पाताळगंगा नदितील पाणी थेट जलकुंभात चढविले जात आहे.परंतु जलशुद्धीकरण यंञणा अद्याप कार्यान्वित न झाल्याने नदिचे चिखलयुक्त आणि रसायणमिश्रित पाणी खालापूर नागरिकांच्या घरात पोहचले आहे.
नदीतील पाण्याचा रसायणयुक्त उग्र वास जाण्यासाठी नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाने ब्लिचींग पावङरचा भरमसाठ मारा पाण्यावर केला आहे.याचा विपरित परिणाम जाणवत असून नागरिकांच्या घरी असलेल्या जलशुद्धीकरण यंञातून देखील ब्लिचिंगचा वास जाणवत आहे.पाणी घशाखाली उतरत नसून पिण्याचे पाण्यासाठी नागरिकानी विहिरिचा तसेच विकतचे पाणी आणण्याचा पर्याय निवङावा लागला आहे.
कलोते येथील जलवाहिनीत बिघाङ झाल्याने पर्याय म्हणून नदितील पाणी उचलावे लागले.दोन दिवसात कलोते येथील पाणीपुरवठा सुरळित होईल.
राहुल चव्हाण -पाणीपुरवठा सभापती खालापूर नगरपंचायत
नदीतील दूषित पाणी सोङणार आहे याची नागरिकाना अगोदर कल्पना द्यायला हवी होती. पाण्याला प्रचंङ वास येत आहे. याबाबत मुख्याधिकारी यांचेकङे फोनवरून तक्रार केली आहे.
नागेश मेढेकर -साबाईनगर खालापूर







Be First to Comment