योजनेमार्फत प्रत्तेकाला रोजगार देण्याचा उद्देश – ना.अदिती तटकरे 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔶🔷🔶
कोरोना महामारी परिस्थितीत सर्वसामान्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत त्यांना आर्थिक दृष्टीने बळकट करण्यास सज्ज झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी या योजनेचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पेण येथे उदघाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून ही रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून ही योजना प्रत्तेक बेरोजगारापर्यंत पोहोचवून त्याचा लाभ तळागाळातील युवक, युवती, शेतकरी, महिला वर्ग आणि ग्रामीण भागातील बेरोजगाराला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा या योजनेचा उद्देश असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
या लाभार्थ्यांची फिरती केंद्रे असल्याने गर्दी टाळता येणार आहे तसेच कोरोना काळात केंद्र आणि राज्य शासनाने लागू केलेल्या सोशल डिस्टनसिंग च्या आदेशाचे पालन देखील होणार आहे. टेम्पो खरेदीसाठी शहरी भागातील पुरुषांकरिता 15 टक्के सबसिडी तर शहरी भागातील सर्व महिलांकरिता आणि एससी, एसटी, ओबीसींसाठी CMEJP अंतर्गत 25 टक्के सबसिडी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात राहणाऱ्या पुरुषांकरिता 25 टक्के सबसिडी आणि ग्रामीण भागातील सर्व महिलांकरिता आणि एससी, एसटी ओबीसींसाठी 35 टक्के सबसिडी मिळणार असल्याने सर्व बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.







Be First to Comment