सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
नागोठण्याजवळील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील वाकणनाका येथील पेट्रोल पंप शेजारी श्री बल्लाळेश्वर गॅस सर्व्हिसेसचा शुभारंभ रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता विधपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
गॅस सर्व्हिसेसच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, सदानंद गायकर, मधुकर ठमके, आमडोशी येथील सुप्रिम पेट्रोकेम लि. जनसंपर्क अधिकारी आनंद वागळे, पाटणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. माधवी सदानंद गायकर, भाजपा रोहा तालुका अध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, नागोठणे भातगिरणी संस्थेचे संचालक चंद्रकांत गायकवाड, पाटणसई ग्रामपंचायत सदस्य सचिन कळसकर, पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, कडसुरेचे सरपंच राजेंद्र शिंदे, युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, चंद्रकांत जांबेकर, वांगणी ग्रामपंचायत सदस्या सौ. शुभांगी एकनाथ जांबेकर, वांगणी माजी सरपंच सौ. मीनाक्षी प्रमोद जांबेकर, लहू तेलंगे, एकनाथ जांबेकर, रमेश भिसे, युवक राष्ट्वादीचे विभागीय अध्यक्ष निवास पवार, दिपेंद्र अवाद, नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग, सुनिल लाड, सामाजिक कार्यकर्ते अनिल डाकी, रोहिदास हातनोलकर, मनोज टके, चेतन टके, धृव सोष्टे, अक्षय नागोठणेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी गॅस सर्व्हिसेसचे संचालक प्रमोद जांबेकर व स्वप्निल जांबेकर यांना त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नंतर आमदार तटकरे यांनी पाटणसई ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज याचे दर्शन घेतले. मंदिरात पाटणसईच्या सौ. मधवी सदानंद गायकर, राष्ट्वादीचे विभागीय अध्यक्ष सदांनंद गायकर यांनी आ. अनिकेतभाई तटकरे यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय नेते भाई टके, मधुकर ठमके व चंद्रकांत जांबेकर उपस्थित होते.







Be First to Comment