Press "Enter" to skip to content

रोहा ग्रामीण जिल्हा उपरुग्णालयांच्या डॉक्टरांनी मानले खासदार सुनिल तटकरेंचे आभार


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷

खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील उपग्रामीण रुग्णालयाला रक्त पुरवठा त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी सुविधा तसेच डॉक्टरांची विशेष व्यवस्था केल्याबद्दल येथील डॉक्टरांनी सुतारवाडी येथे तटकरे यांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले.

खासदार सुनिल तटकरे यांनी कोरोना काळात डॉक्टर, नर्स, तसेच अन्य चांगली सेवा बजावणाऱ्याना रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी सातत्याने संपर्क ठेवून आलेल्या रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न करून तसे आदेशही दिले. त्याच प्रमाणे ज्या ठिकाणी रुग्णांची तपासणी केली जाते त्या ठिकाणी रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. यासाठी खासदार तटकरें सह पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांचे योगदान मोलाचे असून डॉक्टरांनी सर्वांना धन्यवाद दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.