मनसेच्या रुपेश पाटील यांचे प्रयत्न
सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)
गरिब गरजूंना नेहमी मदत करणारे आणि अन्याया विरोधात आवाज उठवणारे मनविसेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी एका कंपनीने दोन महिने थकवलेला पगार मिळवून दिला.पेण तालुक्यातील एका नामांकित कंपनीने दोन महिन्याचा पगार थकवल्याने प्रथमेश म्हात्रे हा कामगार आर्थिक संकटात पडून मानसिक त्रास सहन करत होता अखेर प्रथमेश म्हात्रे याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांची भेट घेउन दोन महिने थकलेल्या पगारा बाबत सांगितल्याने.यावेळी त्वरित रुपेश पाटील यांनी प्रमेश म्हात्रे याला त्याचे कष्टाचे पैसे मिळवून देण्यासाठी कंपनी गाठली आणि मनसे स्टाईलने चर्चा करुन दोन महिन्याचा थकलेला पगार म्हात्रे याला मिळवून दिल्याने प्रथमेश म्हात्रे याने रुपेश पाटील व मनसेचे आभार मानले.
Be First to Comment