Press "Enter" to skip to content

श्री जोगेश्वरी माता मंदिरातील नवरात्रोत्सव शासन नियमानुसार साजरा होणार

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ व व्याघ्रेश्वर या देवतांचा नवरात्रौत्सव श्री जोगेश्वरी माता उत्सव समिती धुमधडाक्यात साजरा करीत असते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्शवभूमीवर हा उत्सव साजरा करताना काही मर्यादा आली आहे. त्यामुळे कोणताही उत्सव वा सण साजरा करताना शासनाने नियमावली तयार केली असून या नियमावलीचे तंतोतंत पालन करून यावर्षी श्री जोगेश्वरी माता मंदिरातील नवरात्रौत्सव साजरा होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी दिली आहे. तसेच याबाबत ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहनही टके यांनी केले आहे.

नवरात्रौत्सव संदर्भात श्री जोगेश्वरी माता विश्वस्त समितीचे सचिव भाई टके यांच्या निवासस्थानी विश्वस्त व उत्सव समितीच्या संयुक्त बैठकीचे आयोजन रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. त्यावेळी श्री जोगेश्वरी माता मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके, विश्वस्त अशोक गुरव, मधुकर पोवळे, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, सचिव अनिल नागोठणेकर, खजिनदार बबन मोरवणकर, सदस्य राजेंद्र गुरव, दिनेश घाग, संतोष नागोठणेकर, दिपक वाडेकर आदी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी सांगितले की दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता देवीची घटस्थापना होणार असून मंदिर प्रांगणात गरबा, रास दांडिया अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत. ध्वनी प्रदूषणासंदर्भात नियमांचे पालन आणि तरतुदींचे पालन कटाक्षाने केले जाणार असल्याचे शेवटी बाळासाहेब टके यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.