Press "Enter" to skip to content

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कट्टर समर्थक “शिवसेनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे”, उरण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सर्वांना सुपरिचित असं व्यक्तीमत्व, शिवसेनेचे उरण मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांना आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नरेश रहाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मायेची उबदार शाळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच भावी आयुष्यासाठी शुभआशिर्वाद देऊन त्यांनी भविष्यात असेच कार्य समाजासाठी व पक्षासाठी करत राहावे हि इच्छा व्यक्त केली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुकासंघटक के.एम.घरत, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, माजी शहरसंघटक महेश वर्तक, ग्रा.सं.क.उपतालुकाप्रमुख पंकज सुतार उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.