ऍड. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू , वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी, लढाऊ, वैचारिक भूमिका व प्रभावी कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सुधागड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत नुकताच जाहीर प्रवेश केला.
रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी, रायगड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंके, जिल्हा सचिव अशोक वाघमारे, महासचिव सागर भालेराव व सुधागड तालुका संपर्क प्रमुख अमोल साळुंके, नारायण जाधव, उत्तम शिंदे, नितीन मोरे, मंदार मोरे, संदीप जाधव ,किशोर मोरे, नामदेव जाधव, अनंता साळुंके, राकेश कांबळे, गणेश शिंदे,आकाश पेरवी,मोहन जाधव, देविदास साध्वी,महेश येलवे, वैभव केदारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड आणि सर्व कमिटी व सम्यक विद्यार्थी आंदोलन कमिटी यांच्या अथक प्रयत्न व परिश्रमाने सुधागड तालुक्यातील आर.पी.आय., बसपा, शेकाप व अन्य पक्ष संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रम पार पडला.
चिवे येथील कृष्णा फार्म हाऊस येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आंबेडकरी बहुजन चळवळीतील अग्रेसर असलेल्या धडाडीच्या तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आता फक्त भिमाच रक्त म्हणत येत्या काळात बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्याचा भरभक्कम निर्धार केला. त्यामुळे सुधागड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा झंजावत सुरू झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अमित गायकवाड यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षाला उभारी मिळाली आहे. राज्य व देशभरात वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणावर लोकहिताची कामे केल्याने अन्य पक्षातील कार्यकर्ते पक्षात सहभागी होत असल्याचे अमित गायकवाड यांनी सांगितले. सुधागड तालुका युवक अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनतर समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन करून प्रगतीपथावर नेण्याचे कार्य बाळासाहेब आंबेडकर अविरतपणे करीत आहेत. आंबेडकरी बहुजन चळवळ भविष्यात मजबुतीने टिकवायची असेल तर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या कुशल नेतृत्वाची नितांत गरज आहे. या जाणिवेतून पुरोगामी व समतावादी विचारधारा जोपासत संविधानिक मूल्यांची जोपासना करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला जिल्ह्यात संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत व बलाढ्य करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते अटीशर्थीविना पक्षात दाखल होताना दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीने नेहमीच कष्टकरी, श्रमजिवी, शोषीत, पिडीत, वंचीत, सर्वसामान्य घटकाच्या उत्कर्षासाठी व हितासाठी काम करीत आहे. स्वाभिमानाने व सन्मानाने जगण्यासाठी आता बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही असे राहुल भागूराम गायकवाड यांनी सांगितले.
प्रवेशकर्त्यांमध्ये रिपाइंचे राहुल भागूराम गायकवाड, बसपाचे भरत यादव, मंगेशभाऊ वाघमारे , राजेश नाना गायकवाड, भागवत गायकवाड, रामचंद्र मोरे, दीपक गायकवाड, चंद्रकांत जाधव,प्रवीण गायकवाड, संदेश गायकवाड, चेतन भालेराव,दामोदर जाधव, गौतम गायकवाड, सचिन गायकवाड, रमेश साळुंके, सुभाष गायकवाड,सचिन वाघमारे, समीर कांबळे, गणेश शिंदे,समीर गायकवाड, प्रशांत गायकवाड , निलेश जाधव, वैभव केदारीआदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.







Be First to Comment