सिटी बेल लाईव्ह/ अयोध्या.
अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी उद्यापासून (१२ ऑक्टोबर) आमरण उपोषणास सुरूवात करणार असल्याची घोषणा केली आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेपासून उपोषणास सुरूवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अगोदर त्यांनी राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस आमरण उपोषण केलं होतं व त्यानंतर ते चर्चेत आले होते.
या उपोषणाद्वारे ते भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी व मुस्लिमांचे नागरिकत्व समाप्त करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करतील. याचबरोबर परमहंस दास यांनी बांग्लादेश आणि पाकिस्तान राहत असलेल्या हिंदूंना भारतात आणण्याची व भारतातील मुस्लीमांना पाकिस्तान व बांग्लादेशात पाठवण्याची देखील मागणी केली आहे.
या अगोदर देखील महंत परमहंस दास यांनी राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस आमरण उपोषण केले होते व त्यानंतर ते चर्चेत आले होते. आपल्या विविध कृतींमुळे महंत परमहंस दास सातत्याने चर्चेत राहतात.
त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान व बांग्लादेशला मुस्लीम राष्ट्र घोषित करण्यात आले, तर मग भारताला देखील हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं जावं. ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या अधिक आहे, तिथें हिंदूंवर अत्याचार वाढत असल्याचे देखील महंत परमहंस दास यांनी म्हटले आहे. हिंदू व भारताला वाचवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे भारताला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित केलं जावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.







Be First to Comment