Press "Enter" to skip to content

एटीएम मधून आलेली रक्कम प्रामाणिकपणे केली परत


सिटी बेल लाइव्ह । पेण । प्रतिनिधी । 🔶🔷🔶

पेण अॅक्सेस बॅंकेच्या एटीएम मधून नासिर अंन्सारी हा युवक काल आपल्या भावाला 30 हजार 400 रुपये ट्रान्स्फर करण्यासाठी गेला होता मात्र काही टेक्निकली अडचणीमुळे पैसे ट्रान्स्फर न होता तसेच अडकून राहिले होते. पण या युवकाला पैसे ट्रान्स्फर झाले असे वाटल्याने तो तसाच घरी निघून गेला.

त्यानंतर तिथे पैसे काढण्यासाठी प्रमोद भोईर गेले असता त्यांना सदरची रक्कम दिसून आली त्यांनी त्या रक्केबाबत बॅंकेचे मॅनेजर यांना सदरची हकीकत सांगितली व त्यानुसार सीसीटीव्ही तपासले असता सदरची रक्कम नासिर अंन्सारी यांनी टाकली असून ती रक्कम आपल्या भावाला मिळाली नाही अशी तक्रार दिली होती.

त्यानुसार नासिर अंन्सारी याला आज बॅकेत बोलावून सदरची रक्कम त्याला परत देण्यात आली प्रमोद भोईर यांच्या या प्रामाणिकपणामुळे ही रक्कम मिळाली असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी नासिर अंन्सारी, प्रमोद भोईर,भरत साळवी, बॅंकचे मॅनेजर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.