Press "Enter" to skip to content

आमदार अनिकेत तटकरे उद्या नागोठण्यात

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷

नागोठण्याजवळील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील वाकणनाका येथील पेट्रोल पंपा शेजारी रिलायन्स गॅसेस अंतर्गत असलेल्या श्री बल्लाळेश्वर गॅस सर्व्हिसेस चे उदघाट्न उद्या रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता विधापरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या उदघाट्न सोहळ्यास आमडोशी येथील सुप्रिम पेट्रोकेम लि. चे जनसंपर्क अधिकारी आनंद वागळे, एलपीजी बिजनेस रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्र राज्य प्रमुख राजू गंधत व पाटणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मढवी सदानंद गायकर हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री बल्लाळेश्वर गॅस सर्व्हिसेसचे संचालक प्रमोद जांबेकर व स्वप्निल जांबेकर यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.