Press "Enter" to skip to content

कोरोना अपडेट : उरणमध्ये आज १३ पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १३ जण सापडले आहेत. आज उपचार करून कोणालाही घरी सोडण्यात आले नाही तसेच कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह १९६६, उपचार करून बरे झालेले १७३५, उपचार घेणारे १३०, मयत १०१ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज कामठा गणेश अपार्टमेंट ६, जेएनपीटी १, डोंगरी १, भवरा ३, पाणजे १, हरिकृपा अपार्टमेंट गिरी हॉस्पिटल जवळ १ असे एकूण १३ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. आज मात्र कोणीही मयत व कोणालाही उपचार करून घरी सोडण्यात आले नाही.

उरणमध्ये आज पॉझिटीव्हचा आकडा १३ आहे. तर मयत व उपचार करून सोडलेला आकडा शून्य असला तरी जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.