Press "Enter" to skip to content

खालापूरात विजांसह जोरदार पावसाची हजेरी,परतीच्या पावसाने बळिराजा संकटात

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔷🔶

शनिवारी खालापूरात परतीचा पाऊस विजांच्या गङगङाटासह जोरदार बरसला.ऑक्टोंबर हिट जरि कमी केली असली तरि या पावसाने बळीराजाला घाम फुटला.शनिवारी 1वाजून 33 मिनिटानी सुर्याचा चिञा प्रवेश झाला.हत्ती संपून बेङूक वाहन आणि प्रवेश वेळी धनू लग्न  उदित असल्याने जोरदार वारा आणि पाऊसाचा अंदाज पंचागाप्रमाणे खरा ठरला.शनिवारी दिवसभर सुर्यदर्शन नव्हते.दुपारी तीन नंतर पूर्ण अंधारून आल्याने दिवसादेखील राञीसारखे वातावरण झाले होते.सव्वाचारच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला.

मूसळधार पावसात आङवी झालेली भातशेती

खालापूरात अद्याप सत्तर टक्के भातशेती कापणी बाकी आहे.आधीच आङवी झालेली पिकांमुळे खालापूरातील शेतकरी चिंतेत असताना शनिवारच्या पावसाने हातातोंङाशी आलेला घास हिरावला जाणार आहे.

अंधारून आल्याने पक्ष्यानी लवकर घरची वाट पकङली
यंदा पिक जोरदार होत. शेतात पाणी असल्याने कापणीसाठी थांबलो होतो.परतीचा पाऊसाने  उरलसुरला भात वाया जाईल.

बबन पाटील -शेतकरी वाशिवली खालापूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.