Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी उरण तालुका वकील सेल अध्यक्षपदी ऍड.धिरज डाकी

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकूर । 🔶🔷🔶

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी पक्षाच्या उरण तालुका वकील सेल अध्यक्ष पदी बोरखार गावाचे ऍड धिरज लहुकुमार डाकी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ लाड यांच्या उपस्थितीत देण्यात आले .

ऍड .धिरज डाकी यांनी महाविध्यालयीन जीवनात नेतृत्व आणि कौशल्य दाखवत विध्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतानाच इंग्रजी वाड्मय या विषया मध्ये बी .ए .ची पदवी संपादन करून एम .जी ए .लॉ .कॉलेज येथे वकिली शिक्षण पूर्ण केले .

आपल्या कायद्याच्या ज्ञाना च्या बरोबर एस .ई .झेड, नैना प्रकल्प, एम .आर .डी .ए तसेच कामगारांचे प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन जनसामान्यांच्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे .शरद पवार यांच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन उरण पनवेल तालुक्यातील वकिलांना एकत्र आणून जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य ते करत आहेत .
त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, विधान सभा अध्यक्षा भावना घाणेकर, जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, तालुका अध्यक्ष मनोज भगत, कार्याध्यक्ष रमण कासकर, युवक ता .अध्यक्ष समाधान म्हात्रे ,संजय परदेशी , नामदेव मढवी (ता .सरचिटणीस ), सुरेश पाटील (विभागीय अध्यक्ष ), दिपक पाटील ,रत्नाकर म्हात्रे ,प्रदीप तांडेल (ता .संघटक ), मछिंद्र ठाकूर (ओबीसी सेल ता .अध्यक्ष ), सुनील घरत , निलेश ठाकूर आदी सह मित्र परिवार तसेच तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.