Press "Enter" to skip to content

माथेरान नगरपरीषदेत चाललंय तरी काय ?

ठेकेदाराचा प्रताप : जुन्याच कामांची नव्याने डागडुजी ; बिले काढण्यासाठी खटाटोप 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔶🔷🔶

विविध शासकीय निधीतून विकास कामे सुरू असताना जी अत्यावश्यक महत्वाची कामे पूर्ण करावयाची आहेत ती बाजूला सारून जुन्या कामांची नव्याने डागडुजी केली जात असल्याने केवळ आपली बिले काढण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेरिटेज वास्तू असलेल्या माथेरान मधील मध्यवर्ती भागात असलेल्या कापडिया मार्केटच्या नूतनीकरणासाठी जवळपास पाऊण कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये मटण मार्केट सुशोभीकरण त्याचप्रमाणे अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी खर्च केला जाणार आहे परंतु मटण मार्केट,गिरणी दुकाने यांची पुर्णतः दुरुस्तीची कामे अन्य दुकानांच्या रेस्टॉरंटच्या सांडपाण्याचा निचरा करणेसाठी पाईप लाईन बसविणे ही कामे या मोठया रक्कमेच्या खर्चातून पूर्ण करावयाची आहेत.

ही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना अनेकदा मुदतवाढ सुध्दा देण्यात आली आहे. परंतु कामे ही आजही कासवगतीने सुरू आहेत.याच मार्केट मधील कठड्यावर रविवारच्या बाजार दिवशी भाजीविक्रेते व अन्य व्यावसायिक आपला व्यवसाय करत असतात.हा कठडा मागील तीन ते चार वर्षांपूर्वी नगरपरिषदे मार्फत बनविण्यात आला होता.त्या मजबुत कठड्याचा वरील भाग तोडून पुन्हा नव्याने काम सुरू केले आहे.

हा कठडा तोडण्याची काहीही आवश्यकता नसताना हे काम कुणा एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मर्जीनुरूप कामे केली जात असल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच नागरिकांमधून अशा दुबार कामांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे या तोडण्यात
आलेल्या कठड्यातील दगडमाती त्याच कामासाठी वापरले जात आहे.हा सुरू असलेला सर्व खेळ वाढीव कामे दाखवून
ठेकेदारांची बिले काढण्यासाठी असून याकडे नगरपरिषदेचे अभियंते,तसेच कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासन हेतुपुरस्सर कानाडोळा करीत असल्याने या गावात सध्यातरी काय चाललंय,विकास कामे होत आहेत की केवळ ठेकेदारांच्या आणि मर्जीतल्या लोकांना कामे देऊन त्यांच्या फायद्यासाठी संबंधित ठेकेदारांना सातत्याने मुदतवाढ का दिली जात आहे असेही नागरिक बोलत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.