Press "Enter" to skip to content

नागोठणे पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶

आगामी काळात येणारे नवरात्र उत्सव व ईद ए मिलाद या सणांच्या अनुषंगाने नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक नागोठणे पोलिस ठाण्यात संपन्न झाली.

यावेळी नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, आरपीआय पक्षाचे कोकण नेते व्ही. के.जाधव, मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी, आरपीआय तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मोहन नागोठणेकर, अकलाख पानसरे, ज्ञानेश्वर साळुंखे, युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दिनेश घाग, चेतन कामथे, हुसेन पठाण व पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक आदींसह प्रमुख नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत सण शांततेत साजरा करणे तसेच कोविड १९ संदर्भात नियमावलीचे पालन करण्याबाबत बाबत पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांनी मार्गदर्शन करून आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या. तसेच सध्या सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या वादग्रस्त पोस्ट बाबत व अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट अथवा लिखाण न करणे बाबत सूचना देऊन शांतता राखणे बाबत पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांनी सर्व नागरिकांना या बैठकीत आवाहन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.