Press "Enter" to skip to content

फार्महाऊसमध्ये शिरलेल्या नागाला सर्पमित्र संदीप जाधव यांनी दिले जीवनदान…!

नागाला शिताफीने पकडून सुखरूप सोडले जंगलात 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

 सुधागड तालुक्यातील तिवरे येथील सिद्धिविनायक फार्म हाऊसमध्ये साडेचार फुटांहून अधिक लांबीचा नाग शिरला होता. या नागाला सर्पमित्र संदिप जाधव यांनी मोठ्या शिताफीने पकडले व वनविभागाच्या सहकार्याने सुखरूप खांडपोली येथील जंगलात सोडले.

सुधागड तालुक्यात सापांविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे .  त्यामुळे घरात, शेतात, फार्महाऊस आदी ठिकाणी सापडलेल्या सर्प, नाग यांना सर्पमित्रांच्या मदतीने जीवनदान मिळत आहे.

        विशेष म्हणजे तीवरे येथे सापडलेल्या या नागाने 4 ते 5 अंडी फस्त केली होती. आणि ती बाहेरून दिसत होती. मनुष्यवस्ती किंवा घरात साप आल्यास घाबरून जाऊ नये व त्याला न मारता जवळच्या सर्पमित्रांना बोलवावे असे आवाहन सर्पमित्र संदीप जाधव यांनी यावेळी केले.  

नागाला सुखरूप जंगलात सोडतांना सर्पमित्र संदीप जाधव.
सुधागड तालुक्यातील सर्पमित्र सापांविषयी जनजागृती करीत आहेत. मागील 2-4 वर्षात सर्पमित्रांच्या मदतीने अनेक सापांना जीवदान मिळत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. नागरीकांनी सापाला न मारता वनविभाग अथवा सर्पमित्र यांची मदत घ्यावी.

समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, सुधागड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.