सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶
युवकांचे प्रेरणास्थान व युवक राष्ट्वादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे प्रमुख आधारस्तंभ विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा आगामी वाढदिवस नागोठणे शहर व विभाग युवक राष्ट्वादी काँग्रेस कडून ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरालगत असलेल्या कै. तात्यासाहेब टके सभागृहात १८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर व इतर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
याविषयीच्या एका बैठकीचे आयोजन शुक्रवार दिनांक ९ आॅक्टोबर रोजी चिकणी येथील हाॅटेल गुलमोहर येथे करण्यात आले होते.
युवक राष्ट्वादीचे नागोठणे विभाग अध्यक्ष निवास पवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शिवरामभाऊ शिंदे, राष्ट्वादीचे रोहा तालुका कार्यकारिणी सदस्य व
पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य सचिनशेठ कळसकर, पिगोंडे ग्रामपंचायत सरपंच संतोषभाई कोळी, कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे, रायगड जिल्हा युवक राष्ट्वादीचे सरचिटणीस विनायक गोळे, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य आकलाख पानसरे, अतुल काळे, वांगणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जांबेकर नागोठणे विभाग युवक राष्ट्वादीचे अध्यक्ष निवास पवार, शहर अध्यक्ष दिनेश घाग, दीपेंद्र आवाद, चेतन टके, धृव सोष्टे, किशोर कदम, कु. करण लाड, राष्ट्वादी विद्यार्थी संघटना रोहा तालुका अध्यक्ष कु. अक्षय नागोठणेकर, नागोठणे शहर अध्यक्ष कु.केतन भोय तसेच विभागातील युवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रायगड-रत्नागिरिचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती ताई तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातत्याने समाजपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नागोठणे विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना विषाणुच्या महाभयंकर संकटासोबत सामना करत असताना आत्यवश्यक असलेला रक्ताचा तूटवडा दिसून येत असतानाच नागोठणे विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रसच्या माध्यमातून या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. डाॅ. डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेज व हाॅस्पीटल मधील रक्त पेढीच्या सहकार्याने होणाऱ्या या शिबिरातून १०० पिशव्या रक्त जमा करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला आहे.








Be First to Comment