बँक आँफ बरोडा शाखा अलिबाग यांच्या सौजन्याने उपक्रम 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔶🔷🔶
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने बँक ऑफ बडोदा शाखा अलिबाग. यांच्या सौजन्याने वित्तीय साक्षरता आणि वित्तीय समावेशन शिबीर वाडगाव ता. अलिबाग आदिवासी वाडी येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नाबार्ड जिल्हा संचालक सुधाकर रगतवर यांनी सहकार्य केले.

सदर कार्यक्रमात बँक आँफ बरोडा अलिबाग शाखेचे शाखा प्रबंधक पुल्ला हरी बाबू यांनी प्रधानमंत्री जन धन योजना , प्रधानमंत्री सोशल सुरक्षा विमा योजना , अटळ पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना या केंद्रशासनाच्या योजनांचे उपस्थितांना महत्त्व पटवून दिले. बिझनेस असोसिएट संदीप माने आणि बँक मित्र तेजस म्हात्रे व बँकेचे सर्व कर्मचारी यांनी आदिवासी महिला व पुरुषांचे प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजने सह प्रधानमंत्री जन धन योजना या योजने सोबत प्रधानमंत्री सुरक्षा विम्याची २ लाखाची इन्शुरन्स पाँलिसी २५० आदिवासी बांधवांसाठी विनाअट कार्यक्रम स्थळी उघडण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी वाडगाव ता. अलिबागचे विद्यमान सरपंच सरिता जयेंद्र भगत उपसरपंच प्रसाद पाटील यांच्यासह सदस्य जयेंद्र भगत ,सजना नाईक,निलम थळे ,प्रमिला कुले,शुभांगी भगत ,अंजली भगत आदी मान्यवरांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

बँक आँफ बरोडा अलिबाग शाखेने आदिवासी बांधवांसाठी चांगला उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांतर्फे बँक ऑफ बडोदा अलिबाग शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे सर्व स्तरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर बँक आँफ बरोडा शाखेने आदिवासी वाडीवर येऊन आदिवासी बांधवांना सहकार्य केल्याबद्दल बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहे.








Be First to Comment