Press "Enter" to skip to content

रोहा एसटी आगाराच्या सुमारे 22 गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू

प्रवाशांनी एस. टी चाचअवलंब करावा – आगार प्रमुख श्रीमती कांबळे 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔷🔶


कोरोना काळात मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील अनेक आगारातील एस.टी च्या गाड्या आगारातच उभ्या होत्या. नागरिक घरातच राहून आप आपली कामे करत असल्यामुळे एस.टी च्या गाड्यांना प्रवाशी मिळत नसल्यामुळे गाड्या आगारातच उभ्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्याचा परिणाम कामगारांवर होऊन त्यांचे पगार रोखले गेले. गेले सहा महिने असेच झाले. त्यानंतर हळूहळू कोरोनाची भीती कमी झाल्यानंतर प्रवाशी घराबाहेर पडू लागले. अनेक एस.टी आगारातून थोड्या प्रमाणावर गाड्या सोडण्यात आल्या. प्रवाशी मिळत नसले तरी गाड्यांचा नियमितपणा कायम ठेवला. रोहा आगारातून सुटणाऱ्या गाड्या.

रोहा कोल्हापुर 8.15, रोहा पुणे शिर्डी 11.00, रोहा नगर औरंगाबाद 7:15, रोहा तुळजापूर 7.00, रोहा वाई सातारा 13.00, रोहा पाली स्वारगेट 15.00, रोहा अलिबाग बोरीवली 12.00, रोहा तळा बोरीवली 14.00, तळेगाव कोलाड मुंबई 14.00, रोहा माणगाव पुणे 7:45, रेवदंडा रोहा पनवेल 10.00, रोहा रामराज खारबांद्रा 16.00, रोहा रेवदंडा 7.00,7.30, 10.00, 11.15, 13.00, 16.00, 18.15, रोहा तळा 6:30, 8.00, 10.20, 11:30, 14.00, रोहा अलिबाग 06:15, 8.00, 11.15, 12.00, 13.00,13.45, 14.30, 16.15, 18.30, रोहा माणगाव 6.45, 9.20,11.15, 13.30, 14.30, 15.30, 16.30,17.15, 18.35, रोहा कोलाड 8.00, रोहा बारशेत 6:30, 10.00, 13.00, 16.00, रोहा मुरुड 7.00, 11.15, 13.15, 8.15, 16.30, 18.15, रोहा विरझोली 7:45, 9:30, 12:30, 14.00, 16.00, रोहा पनवेल 6:30, 7:15, 8.15, 10.00, 12.30, 14.30, 16.20, पेण 18.15, 9.20, रोहा नागोठणे 9.00, 10.30, 14.45, 15.30, 17.30 इत्यादी कोरोना काळातही लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या सुमारे 22 एस.टी च्या गाड्या विविध मार्गावर धावत असून प्रवाशांनी या मार्गावर जाताना जास्तीत जास्त एसटीनेच प्रवास करून एस.टी महामंडळाला सहकार्य करावे असे आगार प्रमुख श्रीमती कांबळे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.