Press "Enter" to skip to content

12 ऑक्टोंबरला बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांचा फैसला

अविश्वास ठरावाची विशेष सभा होणार 🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔷🔶🔷


मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील ग्रुप ग्राम पंचायतीचे सरपंच नौशाद रज्जाक दळवी यांच्या विरोधात मुरूड तहसीलदार गमन गावित यांच्याकडे सादर केलेल्या अविश्वास अर्जासंबंधी विशेष सभेचे आयोजन 12 ऑक्टोबर 2020 रोजी बोर्ली ग्रामपंचायत कार्यलयात करण्यात आले आहे.

बोर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच मतीन अब्दुल वहाब सौदागर यांच्यासाहित नऊ सदस्यांनी7 ऑक्टोबर2020 रोजी मुरूड तहसीलदार यांच्या कडे अविश्वास ठराव अर्ज सादर केला होता.मुरूड तहसीलदार यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे की,सरपंच हे ग्रामपंचायत सदस्य याना विश्वासात घेत नाही,विकासकामे वेळेवर न करणे,त्याकडे दुर्लक्ष करणे,शासनाकडून आलेला निधी खर्च न करणे,सरपंच यांचा मनमानी कारभार,मासिक सभेत घेण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे,आदी मुद्दे नमूद केले आहे.

अविश्वास ठराव अर्जावर उपसरपंच मतीन सौदागर,ग्रामपंचायत सदस्य चेतन जावसेन,सचिन जंगम,भारती बंदरी,प्रणिता कोपरदर,वैशाली वाघमारे,संगीता वाघमारे,लता वाघमारे,गणेश कट आदींच्या स्वाक्षरीने अर्ज दाखल करण्यात आला आहे.

त्या अविश्वास ठराव अर्जाबाबत मुरूड तहसीलदार गमन गावित यांनी बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सहित सर्व सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम1958चे कलम 35(2) नव्ये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.