जिल्हा शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा : पालीतील शिक्षक कुणाल पवार यांचे रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
‘रक्तदान हेच जीवनदान’,’रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यासह देशात कोरोना संसर्गाचा फैलाव सर्वत्र वाढत आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्तदात्यांनीही रक्तदान करण्याकडे पाठ फिरवली आहे.त्यात रक्तदान शिबिरांची संख्याही अत्यंत कमी प्रमाणात दिसत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती साधली असली तरी मानवी रक्ताला अजूनही पर्याय सापडला नाही, त्यामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
अलिबाग शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत आहे.रक्तसाठा कमी झाल्यामुळे थॅलेसेमिया व रक्ताच्या आजारांशी निगडीत असणाऱ्या रुग्णांना रक्त मिळणे अवघड झाले आहे.
अशावेळी अलिबाग शासकिय रक्तपेढी अलिबाग यांच्या आवाहनानुसार ‘कोरोना संकटकाळात माझे योगदान’ अंतर्गत रविवार दि 11/10/2020 रोजी स.9:30 ते 2:30 या वेळेत सौ इंदिरा सांस्कृतिक भवन,गुजराती समाज हॉल मधली आळी पाली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर पालीतील सर्व जागरूक रक्तदात्यांच्या सहकार्याने संपन्न होणार असून या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपावी असे आवाहन शिक्षक कुणाल पवार यांनी केले आहे.सदर रक्तदान शिबिरात आपले नाव नोंदण्यासाठी व अधिक माहितीसाठी 1) कुणाल पवार : मो.नं.8446872102 2) विकास चित्ते : 9270130575 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.








Be First to Comment