शावेज रिझवी यांची भाजप प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपचिटणीस पदी नियुक्ती.
अल्पसंख्यांक आयोग महाराष्ट्र अध्यक्ष व राष्ट्रीय नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अराफत शेख यांनी शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पनवेल चे धडाडीचे युवा नेतृत्व शावेझ रिझवी यांची नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उप चिटणीस पदी नियुक्ती केल्याची घोषणा केली.त्यांनी यावेळी शावेज रिझवी यांना नियुक्ती पत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष चेतनजी छेडा यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







Be First to Comment