दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२०चा २३वा सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने ४६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून राजस्थानने सुरुवातीला गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघ १९.४ षटकात सर्वबाद १३८ धावाच करु शकला.
दिल्लीच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक ३८ धावा केल्या. २९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार मारत त्याने या धावा केल्या. तर युवा फलंदाज यशस्वी जयस्वालनेही ३४ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार स्टिव्ह स्मिथने (२४ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने (१३ धावा) दोन आकडी धावा पार केल्या.
त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला १० धावादेखील करण्यात यश आले नाही.
गोलंदाजी करताना दिल्लीच्या कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ३.४ षटकात ३५ धावा देत त्याने हा पराक्रम केला. तर आर अश्विन आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी २ विकेट्स चटकावल्या. त्यांच्याव्यतिरिक्त ऍन्रिच नॉर्किए, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनीही एक-एक विकेटचे घेत योगदान दिले.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ४५ धावा केल्या. २४ चेंडूत १ चौकार आणि ५ षटकार मारत ही धावसंख्या गाठली. तर मार्कस स्टोयनिस (३९ धावा) आणि कर्णधार श्रेयस अय्यरनेही (२२ धावा) योगदान दिले. उर्वरित फलंदाजांना जास्त चांगली कामगिरी करता आली नाही.
राजस्थानकडून गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्सची कामगिरी केली. तर कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय आणि राहल तेवतियानेही दिल्लीच्या एक-एक फलंदाजाला पव्हेलियनला रस्ता दाखवला.


Be First to Comment