रजनीशोभा
दिनकर जाता अस्ताला
खेळ रात्रीचा रंगतो
नक्षत्रांचा घेऊन गजरा
चंद्र नभी उगवतो.
झाडे-वेली जरा लाजती
चांदण्यात मग न्हाऊन निघती
कुणी गोधडी लपेटून घेती
स्वप्नात रमुनी कुणी सुखावती.
पहाटवारा अंगावर येई
गुज प्रेमाचे सांगून जाई
अलवार क्षणांना आठवत
मन मात्र सुखावत राही.
खेळ रात्रीचा हलकेच संपतो
तम लोपविण्या भास्कर येतो
अव्याहत हे चक्र चालते
दिन-राती चे असेच नाते.
संध्या करंदीकर, नवीन पनवेल







Be First to Comment