उपविभागीय अधिकाऱ्यांना मनसेचे निवेदन 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पेण । प्रशांत पोतदार । 🔷🔶🔷
महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांच्याचडून, मुंबई-गोवा हायवेपासून हमरापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थे बाबत उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
मुंबई-गोवा हायवेपासून हमरापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था,सततचे खड्डे, चिखल, यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास, दवाखाण्यात जाताना रुग्णांना होणारा त्रास, सततचे बाईक स्वारांचे होणारे अपघात यांमुळे या रस्त्याने ये-जा करणारे प्रवासी हैराण झाले आहेत. या अशा प्रकारच्या रस्त्याच्या दुरावस्थे बाबत लेखी निवेदन मनविसे सचिव रुपेश पाटील यांनी पेण उपविभागीय अधिकाऱ्यांना विठ्ठल इनामदार यांना दिले आहे. तसेच लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलनाचा ईशाराही मनसे सचिव रुपेश पाटील यांनी दिला आहे.








Be First to Comment