उरण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची आढावा बैठक संपन्न 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
आमचे नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविणार असल्याचे सूतोवाच खासदार सुनील तटकरे यांनी उरण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत केले.
उरण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची आढावा बैठक आनंदी हॉटेल उरण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष मनोज भगत, उरण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा भावना घाणेकर, जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, रमण कासकर, गणेश नलावडे, संध्या घरत, समाधान म्हात्रे, प्रदीप तांडेल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे यांनी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करून येथील समस्यां मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करू असे सांगितले.
उरण तालुक्यात अनेक मोठं मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही. तसेच इतर अनेक समस्यां आहेत त्या मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला आपण केंद्रीय नौकानयन मंत्री यांच्यासोबत चर्चा करून त्याला आपण विरोध केला आहे. तरीही काल या संदर्भात बोर्ड मिटींग घेण्यात आली. यामुळे आपण जेएनपीटीचे खासगीकरण होऊ देणार नाही त्यासाठी आपण कामगारांच्या पाठीशी उभे राहू असे सांगितले.
यावेळी पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी स्वागत केले. तसेच इतर पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. यावेळी जेएनपीटी ट्रस्टी दिनेश पाटील व भूषण पाटील यांनी निवेदन सादर केले.
जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पक्षातील अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून पक्ष मजबूत करण्यासाठी संघटित काम करण्याचे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सांगितले. यासाठी गावोगावी बूथ कमिटी स्थापन करून सर्वांना काम करण्याची संधी मिळत पक्षाचीही ताकद निश्चितच वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आपले महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून येथील समस्यां मार्गी लावता येथील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष मनोज भगत, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा भावना घाणेकर, माजी कार्याध्यक्ष अजित पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उरण तालुक्यातील समस्यांना न्याय देण्यासाठी व पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एखाद्या महामंडळात सामावून घेण्याची मागणी करण्यात आली.








Be First to Comment