की आहे फक्त पब्लिसिटी स्टंट?
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस १२’ मध्ये भजनसम्राट अनुप जलोटा यांचे जसलीन मथारूसह असलेले अफेअर पहिल्यांदाच जगजाहीर झाले होते. बिग बॉसमध्ये दोघेही खूप चर्चेत होते. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनीच अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या प्रेमकरणाचा घाट घाताल होता.
अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या या कथित रिलेशनशिप कुणाचाही विश्वास बसला नव्हता. भजन सम्राट
अनुप जलोटा असे काही करतील यावरच कोणाचा विश्वास नव्हता. या अजब गजब जोडीची मात्र सर्वत्रच चर्चा झाली होती.’बिग बॉस’मध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी त्यांनी जसलीन मथारू सह अफेअर असल्याची कबुली दिली होती. भजन सम्राट यांच्या अफेअरच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांची चांगलीच झोप उडवली होती.
मात्र आता अजब गजब कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता तर त्यांनी थेट ४४० व्होल्टचाच झटका त्यांच्या चाहत्यांना दिला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आता पर्यंत केवळ त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत होते. मात्र ते ही एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली होती. आथा तर थेट या दोघांच्या लग्नाचेच फोटो समोर आले आहेत. वयाच्या ६० वर्षी अनुप जलोटा यांनी बाशिंग बांधले आहे तर त्यांच्या तथाकथिक गर्लफ्रेंड जसलीन मथारू नववधूच्या गेटअपमध्ये पाहायला मिळतेय.
सोशल मीडियावर भजन सम्राट अनूप जलोटा आणि गर्लफ्रेंड जसलीन मथारू या दोघांनी लग्न केले असल्याची चर्चा सुरू असून त्यांचे लग्नाचे फोटोही तुफान व्हायरल होत आहे.खुद्द जसलीन मथारू नाच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर होताच अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. बहुतेकांना तर हा फोटो पाहून विश्वासच बसत नाही. तसेच नेहमीप्रमाणे अनुप जलोटा आणि जसलीन हा फोटोदेखील एक पब्लिसिटी स्टंट आहे. लवकरच दोघेही एका सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचाच हा फोटो असावा. फोटोवरून सिनेमा देखील या दोघांवर आधारित असून अजब-गजब लव्हस्टोरीवर असल्याची तर्कवितर्कही लावले जात आहे.







Be First to Comment