Press "Enter" to skip to content

नवीन शेवा ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना

नवीन शेवा गावाला जमीन मोजून द्या, अन्यथा भूमी अभिलेख ऑफिस बाहेर संपूर्ण गावाचे उपोषण 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

जवाहरलाल नेहरू बंदरामुळे पुनर्वसन झालेल्या नवीन शेवा गावाला ३२ वर्षे होऊन ही भूमी अभिलेख विभागातून गावाची जमीन व गावाची सीमा मोजून दिली जात नाही,त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. नवीन शेवा गावाला लवकरात लवकर जमीन मोजून नाही दिली तर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली भूमी अभिलेख ऑफिस बाहेर संपूर्ण गाव उपोषणाला बसेल,तसेच हा विषय गृह निर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्यात येईल असे ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी यांना ठणकावले आहे.

नवीन शेवा ग्राम पंचायत उप सरपंच सौ वनिता म्हात्रे व सदस्या सौ मंजुळा घरत यांनी गावाच्या मोजणीसाठी केलेल्या अर्जावर चर्चा करण्यासाठी भूमी अभिलेख यांनी बोलाविले होते. सदर बोलणी करण्यासाठी आपल्या गावातील उपसरपंच सौ वनिता म्हात्रे, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी अध्यक्ष जगजीवन भोईर, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भोईर, सौ मंजुळा घरत, भूपेंद्र पाटील शाखा प्रमुख शैलेश भोईर, उपशाखाप्रमुख प्रकाश स म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत, विलास म्हात्रे तसेच गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

या मीटिंग मध्ये ३३.६४.०५ हेक्टर चा नकाशा व ३३ हेक्टर संबधित कागत पत्रे देऊन योग्य रित्या चर्चा करण्यात आली.
यावेळी गावचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी गावाच्या वतीने भूमिका स्पस्ट करताना सांगितले की,तुम्ही लवकरात लवकर जमीन मोजून नाही दिलीत तर तुमच्या ऑफिस बाहेर संपूर्ण गावाला घेऊन उपोषणास बसू असा सजड दमच दिला. शाखा प्रमुख शैलेश भोईर यांनी त्यास दुजोरा देत आम्हाला नकाशा प्रमाणे जमीन मोजून द्या अशी भूमिका मांडली.

माजी अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी भूमिका मांडताना आम्हाला गावा भोवतालची जमीन मोजून देण्यात यावी असा आग्रह धरला तर आपल्या गावच्या उपसरपंच सौ वनिता म्हात्रे यांनी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कागद पत्र देऊन सुद्धा तुम्ही टाळाटाळ करता असा दम भरल्यावर भूमी अभिलेख चे अधिकारी यांनी दोन तीन दिवसांचा अवधी द्या मी सोमवारी पुन्हा मीटिंग बोलवतो असे सांगितले.

ग्राम पंचायत सदस्या सौ मंजुळा घरत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की आपल्या गावाचे योग्य रीतीने पुनर्वसन करून घेण्यासाठी आपल्याला निःपक्षपाती एकत्र येऊन व आपला विषय नीट समजून घेऊन योग्य रित्या चर्चेद्वारे सोडविला पाहिजे कारण आज नाहीतर उद्या जेएनपीटीचे खाजगीकरण झाले तर आपल्याला कधीच ३३ हेक्टर जमीन मिळणार नाही. एकदा का ही जमीन आपल्या ताब्यात आली तर आपल्याला उपजीविकेचे साधन निर्माण होईल अन्यथा ना नोकरी ना धंदा असे कठीण जीवन जगावे लागेल तसेच जर आपण आपल्या हक्काच्या जमिनीसाठी आवाज नाही उठवला तर आपला भविष आधारमय होईल याची जाणीव लक्षात घेऊन आपल्या हक्काच्या जमिनीसाठी एक होऊन लढू या असा निर्धार नवीन शेवा ग्रामस्थांनी केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.