Press "Enter" to skip to content

मुंबई-गोवा महामार्ग हरवलाय धुरळा व धुक्याच्या सावटाखाली

वाहन चालकांना करावी लागत आहे तारेवरची कसरत 🔷🔶🔷

वाहन चालक घाशाच्या व श्वासोच्छ्वासाच्या आजाराने त्रस्त : हॉटेल व्यावसायिक देखील त्रस्त 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 💠🌟💠

परतीच्या पावसाने आता जवळजवळ विश्रांती घेतल्याने सध्या मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेच्या वेळेस मोठ्या प्रमाणात धुक्याचे साम्राज्य पसरलेले दिसुन येत आहे. त्यातच याच महामार्गाची लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली असल्याने महामार्गावर धुळीचे प्रमाण देखील वाढले आहे. जणु काही मुंबई-गोवा महामार्ग धुरळा व धुक्याच्या सावटाखाली हरवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पहाटेच्या वेळेस धुके नंतर दिवस-रात्र वाहनचालकांना महामार्गावरील धुरळ्यातुन वाहन चालविणे अवघड झाले आहे. मोटार सायकल चालकांना तर आपले वाहन चालवणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखे झाले आहे. धुराळा नाका तोंडात जाऊन मोटार सायकल वाहन चालक व पादचारी नागरिक हे घस्याचा आजार व श्वासोच्छ्वासाच्या आजाराने त्रस्त झालेले आहेत. तसेच नागोठण्याजवळील चिकणी येथील माहामार्गाच्या बाजूला असलेल्या हॉटेल गुलमोहर सह महामार्गालगत असलेल्या इतर हाॅटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना देखील या धुराळ्या मुळे खुप त्रास होत असल्यामुळे हॉटेलचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे.

याबाबत पाटणसई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गुलमोहर हॉटेलचे मालक सचिन कळसकर यांनी सांगितले की, महामार्ग ठेकेदाराच्या अधिकारी वर्गाकडे यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील ते या बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत. तरी याबाबत माहामार्ग ठेकेदार असलेल्या कंपनीने लक्ष घालून लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.

सध्या सर्वत्र दररोज पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुके पडलेले दिसत आहे. याचाच फटका महामार्गावरील वाहतुकीस बसत आहे. त्यातच पावसाने आता पुर्णत: विश्रांती घेतल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचेही साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे धुरळा व धुक्याच्या एकत्रित झालेल्या वातावरणामुळे पहाटेच्या सुमारास महामार्गावरुन वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे वाहन चालविणे अंत्यत अवघड होत आहे. काही वाहन चालक तर वाहनाची समोरील हेडलाईट चालु करुन वाहन चालविण्याची हिंमत करीत असतात पण समोरील काहीच दिसत नसल़्याने अशा वेळी मोठा अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही वाहन चालक धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे आपले वाहन रस्त्याच्या बाजुला सुरक्षित ठिकाणी लावुन धुक्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुढील प्रवास करीत आहेत.

त्यामुळेच मुंबई-गोवा महामार्गावरुन पावसाळ्यात चिखलातुन व ऊन्हाळ्यात प्रचंड धुरळ्यातुन प्रवास करणे म्हणजेच कोकणवासीयांचे व रायगडकरांचे दुर्भाग्यच समजावे लागेल अशी खोचक प्रतिक्रिया या महामार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गातून व वाहनचालकांतून व्यक्त करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.