Press "Enter" to skip to content

सेफाली थिटे हिने राबविले अभिनव कृषी कार्यक्रम


सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷


रोहे तालुक्यातील खांब गावची सुकन्या सेफाली दीपक थिटे हिने लाँकडाऊन कालावधीत विद्यार्थी ग्रामीण उद्योजगता जाग्रुती विकास योजना अंतर्गत ग्रामीण जाग्रुती कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत
आपल्या प्रकल्पाद्वारे ग्रामीण क्रुषी कार्यक्रम अंतर्गत विविध अभिनव उपक्रम राबवून शेतकरी वर्गाला संबोधित केले आहे.

दापोली महाविद्यालयातील क्रुषीकन्या सेफाली दीपक थिटे ह्या विद्यार्थ्यांनीने आपल्याच गावातील बाळाराम लाडगे आणि इतर शेतकरी वर्गाचे शेतात जाऊन सुधारित भात लागवडीमुळे बियाणांची ३० % बचत कशी होते,त्यामुळे रोपे तयार करण्याचे तंत्र,पैसे व मजूरीची खर्च यांची बचत कशी होते याबाबत कानमंत्र देऊन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

पोल्ट्री फार्म व्यवसायिक यांच्या पोल्ट्री फार्मवर जाऊन पिल्लांना राणीखेत हा रोग होऊ नये यासाठी पिल्लांना लस कशाप्रकारे दिली पाहिजे,तसेच इतर रोगांपासून बचाव व्हावा यासाठी औषधांची फवारणी कशाप्रकारे करणे आवश्यक आहे, याबाबतही प्रात्यक्षिक करुन दाखविले.या क्रुषीकन्येने शेतकरी वर्गाला केलेले मार्गदर्शन व प्रात्यक्षिकद्वारे शेतकरी वर्ग प्रभावित झाले सेफाली थिटे हिने माहिती करून दिलेले शेतीतील विकसित नवनवीन तंत्रज्ञान आम्हां शेतकरी वर्गाला निश्चितच फायदेशीर ठरेल अशाप्रकारची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.