कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभागामार्फत उद्धर येथे पॉलिहाऊस मधील भाजीपाला लागवड प्रशिक्षण कार्यक्रम 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली । रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांना संपन्न कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग यांच्यामार्फत विकेल ते पिकेल संकल्पनेवर कौशल्य आधारित शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना लागवडीचे अचूक धडे व मार्गदर्शन देण्यात आले.
मौजे उद्धर येथे पॉलिहाऊस मधील भाजीपाला लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम उद्धर येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद लांगी व प्रदीप लांडे यांच्या पॉलीहाऊसमध्ये घेण्यात आला. सदर प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहे येथील डॉक्टर जी मांजरेकर विषय विशेष तज्ञ (उद्यानविज्ञा) , हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच आत्मा यंत्रणेचे श्री एस. ए. कोलते प्रकल्प उपसंचालक उपस्थित होते. सदर प्रशिक्षणामध्ये डॉ. मांजरेकर यांनी पॉलीहाऊस मध्ये घेण्यात येणारी पिके टोमॅटो काकडी सिमला मिरची या भाज्यांची लागवड पद्धत रोपवाटिका कशी तयार करावी, त्यानंतर वाफे तयार करताना त्याची घ्यावयाची काळजी, खत व सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन ,पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

आत्मा यंत्रणेचे श्री कोलते सर यांनी विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित शेतकऱ्यांनी बाजारात मागणी असलेला शेतमाल लागवड करावा तसेच आत्मा मार्फत गट तयार करून शेती केल्यास फायदा होऊ शकतो असे सांगितले. तसेच कोकणातील पावसाचे प्रमाण पाहता जर येथील शेतकऱ्यांना चांगला भाजीपाला तयार करायचा असेल तर पॉलिहाऊसमध्ये लागवड करण्यात यावा श्री प्रदीप लांगी व प्रमोद लागली यांनी रामेश्वर शेतकरी गट आत्मा मार्फत स्थापन करून त्यांच्या पॉलिहाऊस मधील गेल्यावर्षी काकडी व शिमला मिरची यांची लागवड केली व उत्पादित शेतमाल पनवेल खांदा कॉलनी व कळंबोली येथील गृहनिर्माण सोसायटी येथे थेट शेतमाल विक्रीने विकला. परंतु चालू वर्षी ग्राहकाची मागणी पाहता आता सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे असे प्रदीप लांडे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्राजक्ता पाटील (काटकर) तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सुधागड यांनी आभार मानले. प्रदर्शन श्री खिल्लारे कृषी सहाय्यक यांनी केले. या कृषी मार्गदर्शन कार्यक्रमाने शेतकऱ्यांना वेळ व काळानुरूप कोणती पीक लागवड करावी याचे ज्ञान अवगत झाले. सदर कार्यक्रमात तालुक्यातील 34 शेतकरी श्री व्ही बी भिसे कृषी पर्यवेक्षक, महेश पोंगडे महाराज आदी उपस्थित होते.








Be First to Comment