कोरोना महामारीने मृत्युमुखी पडलेल्या रास्त भाव धान्य दुकानदारांना नुकसान भरपाई द्या- भरत पाटील 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
कोरोना साथीच्या प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडलेल्या रास्त भाव धान्य दुकानदाराना कोरोना युद्धा म्हणून प्रमाणित करण्यात येवून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पनवेल रास्त धान्य दुकान व किरकोळ राँकेल असोसिएशनचे अध्यक्ष व पनवेल शिवसेना संघटक भरत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
सध्या ज्यांचा कोरोना महामारीत कवडीचे योगदान नाही अशा हौशे , नवशे , गवशे यांचा ” कोरोना योध्दा ” म्हणून सत्कार व फोटो मंत्रीमहोदय अथवा प्रशासकीय अधिका-यांच्या बरोबर प्रसिध्द होत आहेत. वास्तविक पाहता काही ‘ कोरोना योध्दे ” हे कोरोना युध्दात सहभागी झालेले नाहीत. ते कोरोना युध्दात बीळात बसून मजा बघत होते. परंतु वशेलेबाजीमुळे त्यांना कोरोना योध्दा किताव बहाल करण्यांत आलेले आहेत.
कोरोना योध्दा म्हणून पोलिस कर्मचारी , शासकीय कर्मचारी , डाँक्टर, आरोग्य विभागातील कर्मचारी , सफाई कर्मचारी त्याच बरोवर गाव पातळीवर संपूर्ण कुटुंबासह गेली सहा सात महिने नियमितपणे गरीब लोकांना रेशनिंगचे धान्य वितरण करणारे सेवाभावी टुकानदार यांचा प्रामुख्याने कोरोना योध्दा म्हणून सत्कार होणे गरजेचे व आवश्यक आहे. परंतु सरकारी तथा वरिष्ठ अधिकारी याबाबत हेतुपुरस्पर शासनाला माहिती उपलब्द करून देत नाहीत त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचा-यांचा , दुकानदारांचा व त्यांच्या कुटूंबाचा गौरव ‘ कोरोना योध्दा म्हणून होत नाही .
महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात व तालुक्यात आतापर्यत सार्वजनिक रेशनिंग दुकानदार अल्प मोबदल्यात रास्त भाव धान्य दुकानाचा कारभार पहात आहेत, शासकीय धान्याचे वितरण करताना त्यांचा सरळ सरळ संबंध कोरोना बाधित लोकांशी येत असतो त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार पनवेल तालुक्यातील दुकानदार व महाराष्ट्रातील अनेक कोरोना महामारीत संक्रमित असून ३५ ते ४० दुकानदार व त्यांना मदत करणारे मदतनीस कोरोना युध्दात शहीद झालेले आहेत ते शहीद शासनाच्या सवलती व मदतीपासून अदयाप वंचित आहेत.त्यांच्या कामगिरी बाबत कोणीही राजकीय व सामाजिक कार्यकर्ते चकार शब्द बोलण्यास तयार नाहीत
आपला सामाजिक कामांची तसेच तळागाळातील लोकांची काळजी घेणारा व गोरगरीवांचे कैवारी म्हणून आपले नांव लौकीक आहे. तेव्हा कोरोना युद्धात शहीद झालेल्या रास्त धान्य दुकानदार व त्यांच्या मदतनिशांना कोरोना योद्धा प्रमाणित करण्यात येवून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राँकेल विक्रेता वेळफेअर असोसिएशनचे अध्यक्ष भरत पाटील यांनी निवेदनाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.








Be First to Comment