Press "Enter" to skip to content

सुधागडला दिलासा ! तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

405 पैकी 352 जणांनी कोरोनाला  हरवले 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली – बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात  येतांना दिसत आहे. अनेक दिवसांपासून सुधागडवासीय कोरोनाच्या भीतीने धास्तावले होते, मात्र कोरोना रुग्णांचे घटते प्रमाण दिलासादायक ठरत आहे.

मंगळवारी (दि.6) तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. आणखी दोन तीन दिवस रुग्णसंख्या नियंत्रणात राहिल्यास सुधागड कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. असा विश्वास व्यक्त केला जातोय. 

     सुधागड तालुक्यात आता पर्यंत कोरोनाचे 405 रुग्ण झाले असून दुर्दैम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, व आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर कोरोनाचे 352 रुग्ण बरे झाले आहेत. तर तब्बल 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. पाली सुधागड सह संपूर्ण जिल्ह्यात राज्यात माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी व काळजी घेतली जात आहे. परिणामी रुग्ण संख्या घटताना दिसत आहे. दरम्यान प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांसह सर्वोतोपरी  प्रयत्न करीत असून 

 नागरिकांनी शासन नियमांचे काटेकोरपणे  पालन करून खबरदारी घ्यावे असे आवाहन पाली तहसीलदार
रायन्नावार यांनी  केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.