Press "Enter" to skip to content

सुधागडातील विजसमस्या जलदगतीने सुटणार

खा.सुनिल तटकरेंच्या आदेशानंतर पाली विजवीतरण विभागाच्या कृतिशील कामकाजाला गती 🔶🔷🔶

सुधागडच्या विजसमस्येवर राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा व विजवीतरण अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक : विजसमस्या सोडविण्याची उपभियंत्यांची ग्वाही 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली । बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

सुधागड तालुक्यात दिवसेंदिवस विजसमस्या अत्यंत गंभीर  बनत चालली आहे. विजवीतरण विभागाबाबत जनतेत प्रचंड रोष व नाराजी दिसून येत आहे. वाढीव विजबिलानी येथील जनता रडकुंडीला आली आहे. याबरोबरच विजवीतरण कार्यालयाशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारी नागरिक मांडत असताना  खा. सुनिल तटकरे यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले असून यासंदर्भात संबंधित  विजवीतरण अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व आदेश दिले आहेत. त्यामुळे सुधागड तालुक्यातील विजसमस्या व इतर प्रश्न तातडीने मार्गी लागणार आहेत.

सुधागडच्या विजसमस्येसह वाढीव वीज बिले व अन्य तक्रारीच्या अनुषंगाने  राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा व विजवीतरण अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पालीत पार पडली. यावेळी विजसमस्या व जनतेच्या तक्रारी सोडविण्याची विजवितरण विभागाचे  उपभियंता जतीन पाटील यांनी  ग्वाही दिली. मुख्यतः वाढीव वीजबिल कमी करून नागरिकांना दिलासा देणे, तसेच विद्युत पुरवठा कायम सुरळीत राहण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ची क्षमता वाढवून देणे, गावागावातील गंजलेले व धोकादायक पोल व विद्युत वाहिन्या तात्काळ बदलवणे, महागाव, ताडगाव व चंदरगाव येथील फीडरवर अधिक भार येत असल्याने अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो व वीजपुरवठा सुरळीत करताना वेळ जातो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  वाघोशी नजीक फीडर बसविणे गरजेचे असल्याची सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.

जनतेला सुरळीत वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने विजवीतरण विभाग प्रयत्नशील असून वाढीव वीज बिलसंदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. तसेच नवीन फीडर करीता आवश्यक प्रपोजल पाठविण्यात आले आहे. ट्रान्सफॉर्मर ची क्षमता तपासून नवीन ट्रान्सफॉर्मर साठी प्रपोजल पाठवले जाईल, याबरोबरच सर्व गावोगावी पोहचून विद्युत खांब व विद्युत वाहिन्या तपासून आवश्यक असेल तेथे नवीन विद्युत पोल व वाहिन्या बदलवल्या जातील असे उपअभियंता जतीन पाटील यांनी या बैठकीत आश्वाशीत केले.

या बैठकीस रा.काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष गीता ताई पालरेचा, सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष -रमेश साळुंके, तालुका युवक अध्यक्ष -संदेश शेवाळे, पाली शहर अध्यक्ष-अभिजित चांदोरकर, दीपक पवार, प्रकाश आवासकर, दत्ता चव्हाण, नितीन परब, सुरेश धनवी, संदीप कदम, नरेश खानेकर, विलास पालवे, प्रवीण साळुंखे, सुहास कुर्ले, विशाल चिले,हरीचंद्र पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.