Press "Enter" to skip to content

आज उरणमध्ये 16 कोरोना पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह 16 जण सापडले आहेत. आज उपचार करून 20 जणांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाने आज एकहीजण दगावला नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह 1943, उपचार करून बरे झालेले 1718, उपचार घेणारे 126, मयत 99 असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. कामठा 2, कोटनाका 3, भवरा 1, बोकडवीरा 1, जेएनपीटी टाऊनशिप 1, विंधणे 1, म्हात्रे वाडी करंजा रोड 4, साई किरण आनंदनगर 1, गॅलक्सी अपार्टमेंट 1, स्टार कॉम्प्लेक्स म्हातवली 1 असे एकूण 16 पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर फुंडे 2, वारीक आळी नागांव 1, पाणदिवे 1, बोरी 1, नागांव 1, डोंगरी 1, डाऊरनगर 1, पिरकोन 2, कामठा 2, उरण 2, नयन अपार्टमेंट 3, खोपटे 1, दिघोडे 2 असे एकूण 20 जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत नाही.

उरणमध्ये कोरोनाची आकडेवारी जरी कमी वाटत असली तरी जनतेने मास्क, सोशल डिस्टनचा वापर करुन आपली खबरदारी घ्यावी, अन्यथा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नाकारता येत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.