Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची आर्थिक मदत


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶


कर्जत नगरपरिषद क्षेत्रात दहिवली परिसरात जनता विद्या मंदिर प्रशाला ही शाळा आहे या शाळेच्या वतीने नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांच्याकडे विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती करण्यात आली होती त्या विनंतीचा विचार करून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेचा भत्ता शाळेच्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिला आहे.

दहिवली मध्ये जनता विद्या मंदिर प्रशाला शाळेच्या शिक्षकांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करावी याबाबत नगर परिषदेत पत्र दिले होते .काही नगरसेवक सर्वसाधारण सभेचा 200 रुपये भत्ता न घेता तो रिमांड होम किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी जमा करतात. त्यामधून गोळा झालेली रक्कम आणि नगराध्यक्ष यांनी दिलेली आर्थिक मदत असे 10 हजार रुपये नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी शिक्षक लांडगे सर यांच्याकडे सुपूर्त केली. या रकमेतून शाळेतील 15 गरजू विद्यार्थीसाठी शालेय साहित्य आणि फी साठी हे पैसे वापरण्यात येतील असे शाळेचे शिक्षक लांडगे सर यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.