सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔶🔷🔶
गोरगरिब,होतकरू व गरजू विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक मदतीकरिता नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने मागील पाच वर्षाच्या परंपरेने चालू शैक्षणिक वर्षात रोहे तालुक्यातील विविध माध्य.व प्राथ. शालेय गरजू विद्यार्थाना मोफत शै.साहित्याचे पुरविणार असल्याची माहिती ट्रस्टचे प्रतिनिधी आसिफ कासकर यांनी पत्रकारांना दिली.
ट्रस्टच्या शैक्षणिक उद्दिष्टाबाबत पत्रकारांना माहिती देताना प्रतिनिधी आसिफ कासकर यांनी पुढे सागितले की,गतवर्षी ट्रस्टच्या माध्यमातून रोहे तालुक्यातील विविध माध. व प्राथ.शाळेतील सुमारे १००० विद्यार्थांना विविध प्रकारच्या शै.साहित्याचे मोफत वाटप ट्रस्टचे चेअरमन विरेश कोठारी यांच्या विशेष व महत्त्वपूर्ण सहकार्यातून व सामाजिक कार्यकर्ते तथा ट्रस्टचे सदस्य तौसिफ येरूणकर,संदीप विचारे,
यांच्या मदतीने आम्ही आमचा उपक्रम राबवित असून या वर्षी आमचे उद्दिष्ट याही पेक्षा अधिक गरजू विद्यार्थी असणार आहेत व त्या द्रुष्टीने आमचे चांगले प्रयत्न चालू आहेत.
कोरोना महामारीमुळे या शैक्षणिक वर्षी शाळेची घंटा ही वाजलीच नाही. तर कोरोना महामारी आणि नैसर्गिक चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाल्याने याचा सर्वात जास्त फटका हा हातावर कमविणारे मजूरवर्ग,शेतकरी,कष्टकरी जनतेला बसला असल्याने त्यातून सावरणेही कठिण होऊन बसले आहे.अशा परिस्थितीत जास्तीत जास्त गरजू विद्यार्थी आमच्या या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा आमचा मनोदय असल्याचे श्री.कासकर यांनी सांगितले आहे.
प्रगत शैक्षणिक रायगड हे आमच्या ट्रस्टचे उद्दिष्ट असून या उद्दिष्टाच्या प्राप्तीकरिता मागील पाच वर्षापासून रोहे तालुक्यातून प्रारंभ करण्यात आला असून त्या उद्देशाने गत वर्षीही शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच विद्यार्थी वर्गाची सोय व्हावी या करिता लगेचच शै.साहित्याचे वाटप करण्यात आले.तर या वर्षी आँक्टो./नोव्हे.महिन्यात सोशल डिस्टन्सिंग व शासकीय नियमांचे पालन करून आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करणार असून गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हेच आमचे ध्येय असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.







Be First to Comment