निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
ओबीसी समाजाचे प्रलंबित असलेल्या मागण्या सरकारने त्वरित मान्य करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समजबांधवांनी निदर्शने करून आंदोलन केले. ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. आंदोलन कर्त्याना यावेळी घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

ओबीसी समाज हा राज्यात पन्नास टक्के असून आरक्षण हे कमी दिले आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण देऊ नका, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, ओबीसीचा शासकीय सेवेतील अनुशेष भरा मेगा भरती त्वरित करा, 100 टक्के शिष्यवृत्ती द्या, आदिवासी जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्वरत करा, महाज्योति संस्थेसाठी एक हजार कोटीचे पॅकेज द्या, आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्या, शासकीय सेवेतील ओबीसींना पदोन्नती द्या अशा विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज बांधवांनी आंदोलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येऊन निदर्शने केली. यावेळी जे डी तांडेल, अनिल पाटील तसेच इतर मान्यवरांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. यावेळी घोषणाबाजी करून सरकारला जागे केले. त्यानंतर पदाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे आपल्या मागण्याचे निवेदन दिले.








Be First to Comment