Press "Enter" to skip to content

मनीषा वाल्मीकी यांना माथेरान मधून श्रद्धांजली

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔶🔷

उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी या युवतीवर झालेल्या अत्याचारामुळे मृत्यू पावल्यामुळे माथेरान मधील वाल्मिकी समाज ,गुजराती रुखी समाज, बौद्ध समाज आणि आरपीआय शाखेच्या वतीने दि.८ रोजी येथील श्रीराम चौकात उत्तरप्रदेशच्या योगी सरकारचा जाहीर निषेध करून मनीषा वाल्मिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दलित युवती वर झालेल्या अमानुष अत्याचार आणि मृत्यूमुळे त्या नराधमांना ताबडतोब पकडून त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हायला हवी अशा आशयाचे निवेदन या सर्व समाज बांधवांनी अधीक्षक कार्यालयात जाऊन अधीक्षक बापूराव भोई यांना सादर केले आहे.

यावेळी गुजराती रुखी समाज अध्यक्ष अंबालाल वाघेला,वाल्मिकी समाज अध्यक्ष निलेश चव्हाण,आरपीआय अध्यक्ष अनिल गायकवाड नगरसेविका ज्योती सोनावले, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष किशोर सोनावले, महिला अध्यक्षा मनीषा शिंदे,संतोष शिंदे ,राजेंद्र चव्हाण, श्रीकांत कदम,किशन वाघेला,विष्णू वाघेला,गीता पुरबिया,चंपा पुरबिया,गीता वाघेला,प्रिया बलाड आदी समाज बंधुभगिनी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.