श्रीनिवास काजरेकर
नवीन पनवेल: दि.०८
कलादर्पण या कलाप्रेमी संस्थेने नुकतेच एका शास्त्रीय संगीतावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन केले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. मिलिन्द गोखले यांच्या संकल्पनेतून स्वराधना या संगीतप्रेमी संस्थेने हा कार्यक्रम संपन्न केला. ‘कल्याण छाया’ या नावाने संपन्न झालेल्या कार्यक्रमात पनवेल परिसरातील विविध कलाकारानी सहभाग गेतला. या गायकानी कल्याण थाटातील यमन, कल्याण, भूप, केदार, मारुबिहाग अशा विविध रागातील बंदिशी तसेच या रागांवर आधारीत नाट्यगीत, भावगीत, गज़ल आदी गीतप्रकारांचे सादरीकरण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाला.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. मिलिन्द गोखले, रेणुका दलाल, वंदना सहस्रबुद्धे, चैत्राली देसाई, वर्षा जोशी, गिरीश समुद्र, पल्लवी देशपांडे, डॉ. निहारिका व अनुष्का भिडे, भारती देशपांडे आदी कलाकारांनी या कार्यक्रमात सादरीकरण केले. पद्मनाभ भागवत यांनी उत्कृष्ठ तंत्रसहाय्य करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कलादर्पण चे निर्माता व साहित्यिक शंकर आपटे, अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर, सचीव नृपाली जोशी, खजिनदार दिपाली जोशी आदीनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वराधना समूहाची प्रशंसा केली.



शास्त्रीय संगीत आवश्यक
कोणत्याही प्रकारचे गायन शिकायचे असेल तरी स्वर, ताल आणि लयीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. यासाठी शास्त्रीय संगीत हा सर्वांचा आधार आहे. समाजात शास्त्रीय संगीताबद्दल अभिरुची वाढण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे आवश्यक आहे.
पं. मिलिन्द गोखले
ज्येष्ठ शास्त्रीय गायक







Be First to Comment