Press "Enter" to skip to content

शासकीय कार्यालय, नगराध्यक्ष,सभापतींकडे निवेदनाद्वारे मागणी

श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौक चा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हावा या साठी मनसेचा पुढाकार 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । रामचंद्र घोडमोडे । 🔶🔷🔶

श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौकाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक उल्लेख व्हावा यासाठी. मनसे कोकण मुंबई -श्रीवर्धन -म्हसळा संघटनेने पुढाकार घेतला आहे.

संघटनेचे श्रीवर्धन तालुका संपर्क प्रमुख राजेंद्र पारधी (राजु ), श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष सुरज कासरुंग ,आणि तीर्थराज शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौक हे एकरी नाव बदली व्हावे, आपले आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव देण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन नगरपरिषद नगराध्यक्ष, श्रीवर्धन पंचायत समिती सभापती, श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय अशा अनेक ठिकाणी निवेदन पत्र देण्यात आले.

यावेळी मनसे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुशांत पाटील, मिलिंद तोडणकर , प्रतिक राऊत, संदेश कातळकर, मनसे कोकण मुंबई -श्रीवर्धन -म्हसळा संघटनेचे सभासद कु.गणेश चिविलकर, कु. कल्पेश केंद्रे, कु. ओंकार शिंदे , प्रथमेश पवार आदी सभासद उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.