Press "Enter" to skip to content

बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔷🔶

मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्राम पंचायतीचे सरपंच नौशाद दळवी यांच्या विरोधात उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ सदस्यांनी मुरूड तहसीलदार गमन गावित यांच्याकडे अविश्वास ठराव अर्ज सादर केला आहे.

मुरूड तहसीलदार यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे की,सरपंच हे ग्रामपंचायत सदस्य याना विश्वासात घेत नाही,विकासकामे वेळेवर न करणे,त्याकडे दुर्लक्ष करणे, शासनाकडून आलेला निधी खर्च न करणे, सरपंच यांचा मनमानी कारभार, मासिक सभेत घेण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे,आदी मुद्दे नमूद केले आहे.

अविश्वास ठराव अर्जावर उपसरपंच मतीन सौदागर,ग्रामपंचायत सदस्य चेतन जावसेन,सचिन जंगम,भारती बंदरी,प्रणिता कोपरदर,वैशाली वाघमारे,संगीता वाघमारे,लता वाघमारे,गणेश कट आदींच्या स्वाक्षरीने अर्ज दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सदस्य गणेश नारायण कट हे प्रभाग दोन मधून शिवसेनेच्या मदतीने निवडून आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.