आबुधाबी, IPL 2020: कालचा सामना चेन्नईचा संघ सहज जिंकेल, असे वाटत होते. विजयासाठी १६८ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ २ बाद १०० अशा सुस्थितीत होता. पण त्यानंतर अर्धशतकवीर शेन वॉटसन बाद झाला आणि चेन्नईचे अन्य फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यामुळे चेन्नईवर आपल्या हातातील सामना गमावण्याची पाळी आली. पण त्यामुळे गुणतातालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ चौथ्या स्थानावर होता, पण या सामन्यात चेन्नईच्या संघावर विजय मिळवल्यावर केकेआरला बढती मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यानंतर केकेआरच्या खात्यात तीन विजय आणि दोन पराभव आहेत. त्यामुळे सहा गुणांनिशी केकेआरच्या संघाला यावेळी तिसऱ्या स्थानावर बढती मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स हे संघ आहे.चेन्नईचा संघ आजचा सामना जिंकून तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर जाण्याच्या तयारीमध्ये होता. केकेआरला त्यांनी १६७ धावांमध्ये रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांची २ बाद १०० अशी चांगली स्थितीही होती. पण यावेळी जिंकत असलेला सामना चेन्नईने फलंदाजांच्या हाराकिरीमुळे गमावल्याचे पाहायला मिळाले आहे. या पराभवानंतरही चेन्नईचा संघ हा पाचव्या स्थानावर आहे.आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर केकेआर आहे, तर चौथे स्थान विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडे आहे. पाचव्या स्थानावर महेंद्रसिंग धोनीचा चेन्नईचा संघ आहे. गुणतालिकेत सहाव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद हा संघ आहे. त्याचबरोबर सातव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. गुणतालिकेत फक्त दोन गुण असलेला किंग्स इलेव्हन पंजाब हा एकमेव संघ असून ते आठव्या स्थानावर आहेत.
धावांचा पाठलाग करताना पहिल्या दहा षटकांमध्ये वर्चस्व राखल्यानंतरही चेन्नई सुपरकिंग्जला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १० धावांनी पराभव पत्करावा लागला. कोलकाताच्या १६७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ५ बाद १५७ धावांचीच मजल मारता आली. चेन्नईने फाफ डूप्लेसिसला (१७) झटपट गमावल्यानंतरही सामन्यावर वर्चस्व राखले. शेन वॉटसनने ४० चेंडूंत ५० धावा करत कोलकातावर दडपण राखले. मात्र, १३व्या षटकात अंबाती रायुडू बाद झाला आणि पुढच्याच षटकात सुनील नरेनने वॉटसनचा बळी मिळवला. येथून मिळवलेली पकड कोलकाताने अखेरपर्यंत कायम राखली.त्याआधी, चेन्नईने गोलंदाजांच्या जोरावर कोलकाताला मर्यादित धावसंख्येत रोखले. ड्वेन ब्रावोने ३ बळी घेतले. मात्र कोलकाताला अडचणीत आणले ते शार्दुल ठाकूर व कर्ण शर्मा यांनी. दोघांनी कोलकाताची मधली फळी उध्वस्त केली. सॅम कुरननेही दमदार मारा करत इयॉन मॉर्गन व कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले. एका बाजूने संघाचे हुकमी फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या बाजूने राहुल त्रिपाठीने ५१ चेंडूंत ८१ धावांची खेळी करत संघाला समाधानकारक मजल मारुन दिली.
सामन्यातील रेकॉर्ड
केकेआरने पाच वर्षांत ६९ सामन्यात नाणेफेकीचा कौल बाजूने आल्यानंतर आज पहिल्यांदा फलंदाजी घेतली.
ड्वेन ब्रावोने आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पाचवा गोलंदाज ठरला. सर्वाधिक बळी घेणाºया गोलंदाजांमध्ये ब्रावो चौथ्या स्थानी आहे.

Be First to Comment