टी आय ए पदाधिकार्यांनी घेतली सिडको व्यवस्थापकीय संचालक यांची भेट.
महत्वपूर्ण प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली संपन्न
टी आय ए अध्यक्ष सतीश अण्णा शेट्टी यांनी मानले सिडको अधिकाऱ्यांचे आभार
तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांची भेट घेतली. तळोजे औद्योगिक वसाहतीमधील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. सिडकोच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल टी आय ए चे अध्यक्ष सतीश अण्णा पाटील यांनी समाधान व्यक्त करत औद्योगिक वसाहतीतील प्रश्न निश्चितच सुटतील अशी प्रतिक्रिया दिली.
याबाबत सतीश अण्णा शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले असून चर्चा झालेल्या मुद्द्यांचे बाबत प्रसिद्धीमाध्यमांना अवगत केले आहे. या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात की सर्वप्रथम आम्ही मेट्रो प्रकल्पांमध्ये औद्योगिक वसाहती अंतर्गत दोन अतिरिक्त थांबे असावेत अशी विनंती केली आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये तीन लाख कर्मचारी कामानिमित्त येत असल्याकारणाने ते सदरच्या मेट्रो प्रकल्पाचा अवलंब करू शकतील. तसेच औद्योगिक वसाहतीच्या शेजारील गावांना देखील त्याचा फायदा होईल. ही बाब सिडको व्यवस्थापकीय संचालकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सदर प्रकरण मंजुरी करता उच्चपदस्थांकडे पाठवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
सिडको पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेमध्ये टि आय ए पदाधिकाऱ्यांनी फुडलँड फँक्टरी ते सीईटीपी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण जलदगतीने व्हावे अशी मागणी केली. या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून तूर्तास समाधानकारकरित्या होत आहे, असे असले तरी देखील औद्योगिक वसाहतसाठी दुसरे प्रवेशद्वार म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. या रस्त्याचे भौगोलिक महत्त्व अनन्यसाधारण असल्याकारणामुळे मार्च 2021 मध्ये पूर्ण होणाऱ्या या रस्त्याचे काम थोडे जलदगतीने करून ते डिसेंबर 2020 अंती पूर्ण करावे अशी विनंती सिडकोला करण्यात आली. तसेच या रस्त्याचे रोडपाली कडील टोकावर उड्डाणपूल बांधण्याची विनंती सिडकोला करण्यात आली. या ठिकाणी हा रस्ता पनवेल मुंब्रा महामार्गाला छेदत असल्याकारणाने वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते , ती टाळण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल असणे अत्यावश्यक झाले आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या पेंधर स्थानकापासून औद्योगिक वसाहतीच्या इंजिनियरिंग झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी नवीन रस्त्याची निर्मिती केल्यास वसाहतीतील कर्मचाऱ्यांसाठी हा रस्ता वरदान ठरेल, ही बाब मुखर्जी यांच्या निदर्शनात आणून देण्यास टि आय ए पदाधिकार्यांना यश प्राप्त झाले. सदर रस्त्याच्या मंजुरी करता तातडीने कारवाई करू असे आश्वासन यावेळी डॉक्टर मुखर्जी यांनी दिले.
यासोबतच सिडकोने ट्रक टर्मिनस, वेइंग ब्रिज, आणि बफर झोन याकरता भूखंड उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. चर्चेतील बहुतांश मागण्यांवरती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी, सहसंचालक कैलाश शिंदे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश अण्णा शेट्टी, खजिनदार बिनीत सँलियन, जनरल सेक्रेटरी बिदुर भट्टाचार्जी, महासचिव सुनील पधीहारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment