दिनेश झिंगे व अन्य ९ जणांनी लावला २५ लाखांना चुना ; अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रामध्ये झपाट्याने विकास होत आहे. होणाऱ्या विकासाच्या अनुषंगाने या ठिकाणी रहिवासी संकुले उभारणे ही काळाची गरज बनली आहे. गृहनिर्माण संकुले बांधत असताना प्रथितयश विकसकांना स्थानिक शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घ्याव्या लागतात. परंतु अशा प्रकारे जमीन खरेदी करत असताना स्थानिकांनी विकसकाला टोपी लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. खालापूर तालुक्यातील मौजे चौक मानिवली येथील भूधारक दिनेश झिंगे व अन्य ९ यांनी अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांची धादांत फसवणूक केल्याचे प्रकरण बाहेर आले आहे.
खालापूर तालुक्यातील मौजे चौक मानिवली येथील जुना सर्वे क्रमांक १५ (नवीन सर्वे क्रमांक १५/२) वारील ४१ गुंठे जमीन खरेदी करण्याचे अनुषंगाने समझोता करार करण्यात आला होता.हा करार ४ फेब्रुवारी २०२५ रोजी दोन्ही पक्षांनी अटी शर्ती राजी करून जमीन खरेदी व्यवहारातील निकष अंतिम करण्यात आले होते. अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड तर्फे संचालक अशोक छाजेड यांच्यातर्फे अधिकृत स्वाक्षरी करते विनोद दुबे आणि दिनेश राम उर्फ रामचंद्र झिंगे, काशिनाथ बारकू कोंडिलकर, जागृती राम उर्फ रामचंद्र झिंगे, जानकी राम उर्फ रामचंद्र झिंगे, दत्तात्रेय बारकू कोंडिलकर, मनीषा मधुकर गावडे, विशाखा रामचंद्र खारकर, सीताबाई राम गावडे, सविता सुदाम तिखंडे, आराध्या चंद्रकांत वाडेकर यांच्या दरम्यान समझोता करार संपन्न झाला होता. त्या कराराअन्वये आजपर्यंत तब्बल २५ लाख रुपये भूधारकांनी उचलले आहेत. सदर १० व्यक्तींचे सोबत ओमकार सुदाम तिखंडे देखील या षडयंत्रात सहभागी आहे.
एका जमीन खरेदी करणाऱ्या सोबत समझौता करार केलेला असून तसेच त्या पोटी तब्बल २५ लाख रुपयांचे घसघशीत मूल्य उचललेले असून देखील दिनेश राम उर्फ रामचंद्र झिंगे व अन्य ९ यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी नोंदणी कृत दस्त क्रमांक ९०००/२०२५ अन्वये सदरहू जमीन सुनीलकुमार सोनी यांना विकली आहे.
समझोता करार करण्यात आलेला असून देखील दुसऱ्याला परस्पर जमीन विकणे हा धादांत फसवणुकीचा गुन्हा आहे. त्यानुसार एकच जमीन दोघांना विक्री केल्याचे निष्पन्न होते.दिनेश राम उर्फ रामचंद्र झिंगे व अन्य ९ यांनी अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स तसेच सुनीलकुमार सोनी यांची एकाच वेळेस फसवणूक केलेली आहे.
अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स चे संचालक अशोक छाजेड यांच्यातर्फे विनोद दुबे यांनी खालापूर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एका निवेदनाद्वारे तक्रार करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जमीन खरेदी विक्रीची प्रकरणे सध्या पाहायला मिळतात. परंतु अशाप्रकारे सुप्रसिद्ध आणि प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विकसकांना जर का टोपी लावण्याचे धंदे कुणी करत असेल तर त्यांना वेळीच चाप लावणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकरणात चौकशी करून न्याय देण्याच्या प्रक्रियेला जर विलंब झाला तर त्याचा विपरीत परिणाम एकंदरीतच जमीन खरेदी विक्री करण्याच्या इंडस्ट्रीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Be First to Comment