
सुधागड (रायगड), दि. 13 डिसेंबर 2025 :
कौतिके चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे “मिशन – 6” अंतर्गत आज रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वावळोली येथील आश्रम शाळेत शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, ड्रॉइंग पुस्तके, स्केच पेन इत्यादी तसेच प्रत्येक वर्गासाठी 20 लिटर क्षमतेचे पाण्याचे फिल्टर देण्याचा संकल्प फाउंडेशनने राबवला आहे.
कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनने यापूर्वी पाच आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षण प्रवासाला मोलाचा आधार दिला आहे. त्याच मालिकेतील हा सहावा उपक्रम असून, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
“प्रत्येक मदत – एक नवी आशा” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन, समाजातील दानशूर व्यक्ती व शुभचिंतकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने लहानशा मदतीतून विद्यार्थ्यांचे मोठे भविष्य घडावे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास फाउंडेशनचे श्री.विजय गणपत जाधव, श्री. ज्ञानेश्वर जाधव, श्री. आशिष मिश्रा, श्री. निलेश कुटे, श्री. दिपक थोरात, श्री. संतोष जाधव,श्री. अभिषेक सिंग, श्री. ओंकार गंधे, सौ. प्रियांका कुटे पदाधिकारी, शाळेचे शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.






Be First to Comment