Press "Enter" to skip to content

मुलुंड डम्पिंग ग्राऊंच्या जागेवर गोल्फ कोर्सला परवानगी

मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा घशात घालण्याचा भाजपचा डाव !
; खा. संजय दिना पाटील


मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील ) ईशान्य मुंबईतील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेले असताना पालिकेला मात्र गोल्फ कोर्स महत्त्वाचा वाटत आहे. सामान्य जनता मेली तरी चालेल पण श्रीमंताचे लाड पुरवले गेले पाहिजे, यासाठी पर्यावरणाचा अहवाल अंधारात ठेवत पालिका आयुक्तांनी मुलुंड डम्पिंग ग्राऊंच्या जागेवर गोल्फ कोर्सला परवानगी दिली. लाखो रुपये फि असलेल्या अति श्रीमंतांसाठी गोल्फ कोर्स मुलुंड मध्ये आणुन भाजपाचा नक्की उद्देश काय आहे? या निर्णयाच्या विरोधात मुलुंडकरांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून या जागेवर सर्व सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय, क्रिडा संकुल, शाळा व महाविद्यालय बांधण्यात यावे अशी मागणी खा. संजय दिना पाटील यांनी केली आहे. दरम्यान डम्पिंग ग्राऊंडची जागा गोल्फ कोर्सच्या नावाखाली घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी केला असून भाजपाचा हा डाव उधळून लावण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

मुंबई शहरातील सर्व कचरा ईशान्य मुंबईतील मुलुंड, कांजुरमार्ग व देवनार डम्पिंगवर येतो. या तीन डम्पिंग पैकी मुलुंड व कांजुर मार्ग डम्पिंग ग्राऊंड बंद झाले असले तरी देवनार येथे सर्व कचरा आजही टाकला जातो. त्यामुळे या परिसरात राहणा-या नागरीकांचे आयुमान कमी झाले असून त्यांना विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले आहे. मात्र त्यांना उपचार करण्यासाठी या परिसरात एकही अत्याधुनिक सर्व सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मोबाईल टॉर्च मध्ये एका गरोदर महिलेचे प्रसुती केली जाते. त्यात त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. तर घाटकोपर येथील मातोश्री रमाबाई ठाकरे हॉस्पिटलची अवस्था दयनिय झाली असून सर्व सामान्य नागरीकांना उपचारासाठी राजावाडी, सायन किंवा केईएम रुग्णालयात जावे लागते. मात्र राजावाडी व सायन रुग्णालयाची अवस्था पाहता चांगला माणुसही या ठिकाणी आजारी पडू शकतो. व्हेन्टीलेटरवर असलेल्या या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स तसेच इतर कर्मचा-यांची संख्या कमी असून सर्व सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात यावे, अशी मागणी वारंवार डीपीडीसी, पालिका आयुक्त तसेच संसदेत करण्यात आल्याचे खा.संजय दिना पाटील यांनी सांगितले. मुलुंड मध्ये रुग्णालयाची नितांत गरज असताना डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर गोल्फ कोर्स तयार करण्यात येणार असून गोल्फ कोर्सच्या नावाखाली डम्पिंगची सर्व जागा घशात घालण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप खासदार संजय दिना पाटील यांनी केला आहे. मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स करायचे की रुग्णालय या बाबतचा निर्णय पर्यावरणाचा अहवाल आल्यावर घेतला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी खा. संजय दिना पाटील यांना दिली होती. मात्र पर्यावरणाचा अहवाल आला कि नाही. तो अहवाल अंधारात ठेवत पालिका आयुक्तांनी गोल्फ कोर्सबाबत निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय मनमानी असून त्याचा आम्ही कडाडून विरोध करीत असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. मात्र या ठिकाणी गोल्फ कोर्स होऊ देणार नाही असा इशारा खा. संजय दिना पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. आम्ही मुलुडंकरांच्या सोबत असून त्यांना रुग्णालय, क्रिडा संकुल, शाळा महाविद्यालयाची खरी गरज असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले.

या भागात एकही क्रिडा संकुल नसून मुलुंड मध्ये क्रिडा संकुलासाठी राखीव असलेल्या जागेवर भाजापच्य दोन आमदारांनी भुमीपुजन केले. मात्र दहा वर्षात त्यांना क्रिडा संकुल उभारता आले नाही. आता निवडणुका तोंडावर असताना दिखाव्यासाठी विविध कामांचे भुमिपुजन करण्यात येते आहे. खोटी आश्वासन दिली जात आहे. याच सत्ताधा-यांनी मुलुंडकरांना आश्वासन दिले होते की धाराविकारांचे पुर्नवसन मुलुंड मध्ये करण्यात येणार नाही. मात्र भाजपाच्या लोकांनी मुलुंडकरांच्या तोंडाला पाने पुसली असून केवळ धारावीकरच नाही तर या ठिकाणी कबुतरखाना व कुत्र्यांचे निवारा केंद्र ही आणण्यात येणार आहे. केवळ सत्तेच्य जोरावर हे निर्णय घेतले जाते असून ही दडपशाही असल्याचे खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सत्ताधा-यांना संपुर्ण मुलुंडचे डम्पिंग ग्राऊंड करायचे असून त्यांना सर्व सामान्य नागरीकांचे काहीही पडलेले नसल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
*गोल्फ क्लब कोण वापरतात.

साधारणपणे खालील वर्गातील लोक गोल्फ क्लबमध्ये जातात:
मोठे उद्योगपती / व्यावसायिक
उच्चपदस्थ सरकारी अधिकारी
कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी
फिल्म, स्पोर्ट्स, मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी
परदेशी पर्यटक / एनआरआय
महागडे हौशी क्रीडा करणारे उच्चमध्यमवर्गीय

सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती नियमितपणे गोल्फ क्लब वापरत नाही, कारण खर्च आणि वेळ दोन्ही जास्त लागतात.
गोल्फ क्लब वापरणे सामान्य माणसाला परवडते का?

बहुतेक वेळा नाही.
यासाठी कारणे:
सदस्यत्व शुल्क खूप जास्त
साधनसामग्री महाग (गोल्फ किट, शूज, बॉल्स इ.)
मैदानाची देखभाल खर्चिक
वार्षिक फी व प्रवेश फी महाग
बऱ्याच क्लबमध्ये “मेंबरशिप वेटिंग लिस्ट” असते

गोल्फ क्लब सदस्यत्व — किती खर्च येतो? (भारतातील सरासरी)
क्लबप्रमाणे फरक असतो, पण साधारण:

1) लाईफटाईम मेंबरशिप (Lifetime Membership)
₹ 10 लाख ते 50 लाख
(मुंबई किंवा दिल्लीमध्ये हा खर्च आणखी जास्त)

2) वार्षिक मेंबरशिप फीस
₹ 30,000 ते 3,00,000 प्रति वर्ष
3) ग्रीन फी (प्रतिसत्र खेळण्याचे शुल्क)
जर तुम्ही सदस्य नसाल तर:
₹ 1,000 ते 5,000 प्रती सत्र
4) गोल्फ शिकण्यासाठी कोचिंग फीस
₹ 1,500 – 3,000 प्रति तास
पूर्ण कोर्स – ₹ 20,000 ते 60,000
5) गोल्फ किटचा खर्च
मूलभूत किट – ₹ 10,000 ते 25,000
चांगले किट – ₹ 50,000 ते 1.5 लाख

गोल्फ क्लबमध्ये जाणारे लोक कोणत्या वर्गातील?

उच्चवर्ग (High Income Group)
उच्च-मध्यमवर्ग (Upper Middle Class) — पण खूप कमी प्रमाणात
NRI, विदेशी नागरिक
उद्योगपती, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी
कारण: या खेळाला वेळ + पैसा + मोठी जागा लागते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.