

महेंद्रशेठ घरत यांची आई गावदेवी चषक विंधणेला एक लाखांची देणगी
उलवे, ता. १३ : “सर्वसामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळून निघाली आहे. सत्ताधाऱ्यांना जनतेशी देणेघेणे नाही. जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये जाणारी मंडळी वाढली आहे. भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. तेथे भल्याभल्यांना शेवटच्या रांगेत उभे राहावे लागतेय. त्यांना उंबरठ्या बाहेर ठेवले जात आहे. त्याउलट परिस्थिती कॉंग्रेसमध्ये आहे. कार्यकर्त्यांना कॉंग्रेसमध्ये सन्मान आहे. कॉंग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव जोपासतोय. त्यामुळे देशाला कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत विंधणे येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते आई गावदेवी क्रिकेट चषकाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली.
खोपटे ते विंधणे अशी कॉंग्रेसची भव्य रॅली काढण्यात आली. महेंद्रशेठ घरत रॅलीच्या माध्यमातून विंधणे येथील क्रिकेट मैदानावर आले. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मैदान कॉंग्रेसमय झाले होते. जुनेजाणते निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र आल्याने महेंद्रशेठ घरत यांनाही आनंद झाला. त्यांनी सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि आभारही मानले.
यावेळी मिलिंद पाडगावकर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, मार्तंड नाखवा- अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश फिशर मॅन, विनोद म्हात्रे- तालुका अध्यक्ष, डॉ. मनिष पाटील- माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद, अलंकार परदेशी, अविनाश ठाकूर, मुरलीधर ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, लंकेश ठाकूर, वैभव पाटील, संजय ठाकूर, विनोद पाटील, घनश्याम पाटील, बी. एम. ठाकूर, रामनाथ पंडित,अंगद ठाकूर, राजेश ठाकूर, उमेश भोईर, विवेक म्हात्रे,आनंद ठाकूर, मंगेश म्हात्रे, प्रसाद पाटील आणि विंधणे येथील कॉंग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Be First to Comment